top of page

श्री हिंगुलांबिका देवी स्थापना दिवस

DSC09119_edited.jpg

 संपूर्ण जगामध्ये मान्यताप्राप्त देविचे 51 शक्तीपीठ अस्तितवात आहेत. त्या 51 शक्तीपीठापैकी श्री हिंगुलांबिका देवीचे पहिले पिठ म्हणून मान्यता आहे. हे पहिले पीठ भारताचे विभाजन झाल्यानंतर पाकीस्तान मध्ये स्थित आहे. हे ठिकाण बलुचिस्थान प्रातांत हिंगोल नदीच्या तिरावर स्थित आहे. तेथे जाण्याकरीता खडतर मार्ग आहे. भारतामधील देवि भाविक भक्तांना तिथे जाण्या करीता पासपोर्ट व्हिजाची आवश्यकता असून जवळपास 3 ते 4 किमी पायी डोंगर द-यातून खाच खळग्यातून प्रवास करावा लागतो. भावसार समाज, राजस्थानी समाज, ब्राम्हण समाज, सिंधी समाज व अश्या अनेक समाजाचे भाविक भक्त असून ही माता त्या समाजाची कुळदैवत आहे.  

 

   परभणी भावसार समाजाने पुढाकार घेऊन कारेगांव परिसरात दत्तधामच्या मागील बाजूस स.नं.17/01 मध्ये समाजाचे एकत्रिकरण करण्या करीता एकूण 48 प्लॉटचा भखंड विकत घेऊन सभासदास भावसार समाज नियोजित गृह निर्माण संस्था निर्माण केली. त्यावेळी श्रीमान प्रभाकर रामभाऊ अंबेकर, कार्यकारी अभियंता, स.भु. श्री मारोतराव गंगाधर लांडे, प्राध्यापक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, श्री अरविंदराव महिंद्रकर, श्री दत्तोपंत मसारे यांनी या करीता बरेच कष्ट घेतले. सदरील ले-आऊट मधिल मोकळी जागा साधारणत: 8500 चौ.फूट वर तत्कालीन श्री चंद्रशेखर वसंतराव तुंगे, कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री हिंगलाजमाता देवी मंदिराचे काम हाती घेण्यात आले. सर्वप्रथम रितसर बांधकाम परवानगी घेण्यांत आली. त्यानंतर समाजाजवळ असलेल्या जमा निधीमधून 16 x 16 गाभा-याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. श्री हिंगलाज मातेची मुर्ती कर्नाटक मधिल होनगुंटी या भिमा कागीनी नदीच्या तिरावर एक हकमाडपंती मंदिर वसलेले आहे. देविस एका मुनीने घोर तपश्चर्यने प्रसन्न करुन या ठिकाणी देविस आणलेले आहे. या देविस तेथे चंद्रलंबा हया नावाने ओळखले जाते परंतु मुळ श्री हिंगलाज माता होय. या ठिकाणी देवी स्वंयभु मुर्तीच्या स्वरुपात आहे. हि सर्व माहिती घेऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन श्री मुरलीधर चांडगे, श्रीराम मा. गर्जे, श्री गजानन खपले यांनी सहपरिवार जाऊन तिथे मुक्काम करुन श्री देवीचा अभिषेक करुन तेथिल ब्रम्हवृंदाना भोजन घालून श्री देवीचा फाटो घेऊन श्री क्षेत्र पंढरपूर येथे येऊन तेथिल मुर्तीकार श्री परदेशी यांची भेट घेऊन मातेचा

फाटो देऊन तशीच मुर्ती तयार करण्यास सांगीतले व त्यांनी ही त्यास मान्यता देऊन साधारण 3 महिण्यात काळया मार्बल मध्ये सिंहारुड मुर्ती तयार करुन नोव्हेंबर 2007 मध्ये मुती्र तयार होऊन श्री गजानन खपले व श्रीराम गर्जे यांच्या करवी परभणी मुर्ती आणून व वसमत रोड येथिल श्री प्रभाकरराव बंडे यांचे निवासस्थानी मुर्ती ठेवण्यात आली.

     ह.भ.प.श्री बाळूगुरु असोलेकर परभणी यांचे मार्गदर्शनाखाली तथा त्यांच्या पावनस्पर्शाने तसेच वेद पठणाने व संपूर्ण शास्त्रोक्त पध्दतीने दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी 2008 रोजी श्री हिंगलाज मातेची प्रतिष्ठापणा करण्यात आली. तत्पूर्वी परभणी शहरातील सर्व भावसार समाज बांधव व परिसरातील तथा परभणी शहरातील सर्व भाविक भक्तांना रितसर निमंत्रण देण्यात आले. दिनांक 16/02/2008 रोजी सर्व प्रथम श्री बंडे यांचे घरापासून ते नियोजित मंदिरापर्यंत देविची बँड,लेझिम पथक, अश्व, व सर्व समाज बांधव व भाविक भक्त यांच्या सहभागाने भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर देविस अभिषेक, देविस पहिले दोन दिवस तांदूळाच्या राशीमध्ये ठेवून विधीवत स्थापना करण्यात आली. तिसरे दिवशी महाप्रसादाने सांगता झाली.

संपर्क

श्री हिंगुलांबीका देवी मंदिर, कुलस्वामिनी भावसार नगर, दत्तधाम मंदिराच्या मागील बाजुस, वसमत रोड, परभणी 431401 (महाराष्ट्र)

मो. +91 8788 398034   

ई-मेल : hindevimandir@gmail.com

2023 © AAK Digital Printing Services

bottom of page