
Reg.No - A5024 (Parbhani)



आमची दृष्टी आ णि ध्येय
एचएम देवी मंदिर PBN ची स्थापना एक पवित्र जागा तयार करण्याच्या दृष्टीकोनातून करण्यात आली जिथे लोक दैवीशी जोडू शकतात आणि आंतरिक शांतीचा अनुभव घेऊ शकतात. आमचे ध्येय एक स्वागतार्ह आणि सर्वसमावेशक वातावरण प्रदान करणे हे आहे जिथे जीवनाच्या सर्व स्तरातील लोक एकत्र येऊन अध्यात्म शोधू शकतील, त्यांचा सराव सखोल करू शकतील आणि समुदाय शोधू शकतील. या आणि आमच्या वाढत्या कुटुंबाचा एक भाग व्हा.
श्री हिंगुलांबिका देवि विश्वस्त न्यासास देणगी देणे बाबत अवहान करण्यात येते की, या संस्थानमध्ये सद्यस्थितीत देविची उपासना तर होतेच परंतु त्याच बरोबर हे सामाजिक सभागृह होण्याकरीता महिला सशक्तीकरणा अंतर्गत शिलाई मशिन प्रशिक्षण केंद्र चालू असून लवकरच या ठिकाणी संगणक प्रशिक्षण केंद्रही चालू करणार आहोत.
त्याच बरोबर या ठिकाणी लवकरच नेहमीसाठी 50 व्यक्तीकरीता प्रत्येक मंगळवार व शुक्रवार रोजी अन्नदान कार्यक्रम महाप्रसाद स्वरुपात राबविण्यात येणार आहे. या करीता येथे सभागृहाचे व खोल्याचे बांधकामा करीता तसेच वरिल सेवा ही नियमीत करण्याकरीता देणगीची आवश्यकता आहे. संस्थानच्या वतीने मातेची शास्वत पुजा/अभिषेक आपल्या जन्मदिनी अथवा लग्नदिनी वर्षातून एक वेळेस करण्यासाठी रु.1001/- (रु.एक हजार एक केवळ) भरुन नांव नोंदणी करावी हि विनंती. आपणा सर्व भाविक भक्ताना नम्र विनंती की आपण आमुल्य योगदान देऊन संस्थनला सहकार्य करावे हि नम्र प्रार्थना.
जय हिंगलाज

