
Reg.No - A5024 (Parbhani)

श्री हिंगुलांबिका देवी मुर्ती शास्वत पूजा
श्री हिंगुलांबिका देवि मातेची प्रतिष्ठापणा झाल्यानंतर थोडयाच कालावधीत मंदिर समितीकडून निर्णय घेण्यात आला की, या ठिकाणी मातेची शास्वत पूजा सुरु करावी. त्या दृष्टीने परभणी शहरातील तथा भावसार बांधवास व भाविक भक्तास अहवान करण्यात आले. त्या प्रमाण आज पर्यंत जवळपास 250 ते 300 शास्वत पुजेचे सदस्य झालेले असून भक्ताच्या वतीने येथे भक्ताने दिलेल्या तारखेस वर्षातून एक दिवस त्यांचे नांवाने गुरुजी अभिषेक पूजा करता. भाविक हजर नसेल तर त्यांना त्यांच्या घरी प्रसाद पोहंचविला जातो.
शास्वत पुजे करीता प्रत्येक भाविक-भक्ताकडून रुपये 1001/- एवढी वर्गणी घेण्यात येते व त्यांना शास्वत पुजेचे सदस्य केले जाते. याव्दारे सर्व भावसार बंधू-भगिनी तथा सर्व भाविक भक्तांना अवहान करण्यात येते की, आपण मातेच्या शास्वत पुजेचे सदस्य होऊन मंदिर समितीस सहकार्य करावे हि नम्र प्रार्थना. या सोबत मंदिर खात्याचा क्यूआर कोड दिलेला आहे त्यांचा उपयोग करुन आपण वर्गणी खात्यात जमा करु शकतात.

