top of page

एचएम देवी मंदिराबद्दल

logo.png

माहे फेब्रुवारी 2008 मध्ये परभणी येथे श्री हिंगुलांबिका देविची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर ऑगष्ट 2008 मध्ये परभणी भावसार महिला मंडळाची बैठक होऊन त्यामध्ये बचतगट स्थापनेबाबत विचार विनियम होऊन सौ. वंदना श्रीराम गर्जे यांचे अध्यक्षतेखाली बचत गटाची स्थापना करण्यात आली. बचतगटाचे खाते महाराष्ट्र ग्रामिण बँक, वसमत रोड, परभणी शाखेमध्ये उघण्यात आले.

 

     बचतगट स्थापनेच्या वेळी गटाचे 17 सभासद झाले. प्रत्येक सभासदाची मासिक वर्गणी रु.100/- ठरविण्यात आली. त्यानंतर माहे ऑक्टोबर 2009 पासून 12/2021 पर्यंत रु.11,29,000/- एवढया रक्कमेचे कर्ज सभासदाना देण्यात आले.

     वरिल प्रमाणे सभासदांच्या मागणीनुसार सभासदाच्या मुला-मुलींच्या लग्नाकरीता, मुलांच्या उच्च शिक्षणाकरीता, घराचे दुरुस्ती करीता तसेच ईतर अडी-अडचणी सोडविण्याकरीता गटाचे माध्यमातून कर्ज स्वरुपात मदत करण्यात आली. सदर कर्जावर 2 टक्के प्रमाणे व्याज आकारणी करण्यात येऊन रक्कम 10 हप्त्यात वसूल करण्यात आली आहे. माहे एप्रिल 2018 पासून मासिक वर्गणी मध्ये 200/- रु. वाढ करुन रु.300/- करण्यात आली आहे. आज गटाचे खात्यात रु.5,76,354/- शिल्लक आहे.

     सौ.वंदना श्रीराम गर्जे यांचे अध्यक्षतेखाली माहजे जानेवारी 2019 पर्यंत गटाचे कामकाज चालू होते. त्यानंतर सौ.निर्मला रामराव भावसार अध्यक्ष व सौ. सुनंदा गजाननराव खपले यांचे मार्फत गटाचे कामकाज सुरु असून आता गटाचे अेकून 12 सभासद आहेत.

Bachat Gut.JPG

पत्ता

500 टेरी फ्रॅन्साइन स्ट्रीट

सॅन फ्रान्सिस्को, CA 94158

info@mysite.com
१२३ ४५६ ६७८०

© 2035 लॉरेन्स. द्वारा समर्थित आणि सुरक्षितWix

bottom of page